| पनवेल | वार्ताहर |
तळोजा एमआयडीसी येथे कामास जातो असे सांगून घराबाहेर पडलेला मुंबईतील रहिवाशी पुन्हा घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. बाळाजी इंगळे असे या इसमाचे नाव असून त्यांचे वय 50 वर्षे असून त्यांचा चेहरा गोल, अंगाने मजबूत, केस पांढरे, उंची 5 फुट अंदाजे, डोळे काळे, नाक सरळ आहे. त्यांना भाषा मराठी, हिंदी बोलता येते. सदर इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे (मो.नं. 7972134193) यांच्याशी संपर्क साधावा.
कामास जातो असे सांगून इसम बेपत्ता
