धरमशाला | वृत्तसंस्था |
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसर्या टी 20 सामन्यात भारताचा सलामीवीर इशान किशनच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्याला हिमाचल प्रदेशमधील रूग्णालयात नेण्यात आले होते. इशान किशन बरोबरच श्रीलंकेचा फलंदाज दिनेश चंदीमलला देखील रूग्णालयात नेण्यात आले आहे. फिल्डिंग करत असतना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती.
दरम्यान इशान किशनवर उपचार करणार्या डॉ. शुभम यांनी सांगितले की, ममला भारतीय क्रिकेट संघाकडून संपर्क करण्यात आला होता. मला माहिती देण्यात आली की भारतीय खेळाडूच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला रुग्णालयात आणण्यात आले. त्याचा सीटी स्कॅन करण्यात आला असून त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.फ
डॉ. शुभम पुढे म्हणाले की, मश्रीलंकेचा खेळाडू देखील रूग्णालयात दाखल झाला आहे. त्याच्या अंगठ्याला दुसर्या टी 20 सामन्यात दुखापत झाली होती. आम्ही त्याच्यावरही लक्ष ठेवून आहोत सध्या परिस्थिती सामान्य आहे.फ
दुसर्या टी 20 सामन्यात श्रीलंकेने भारतासमोर 184 धावांचे तगडे आव्हान ठवले होते. मात्र भारतीय फलंदाजांनी हे आव्हान 18 व्या षटकातच पार करत मालिकेतला सलग दुसरा सामना जिंकला. याचबरोबर भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. भारताकडून श्रेयस अय्यरने (डहीशूरी खूशी) धडाकेबाज फलंदाजी करत 74 धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 48 धावांची तुफानी खेळी करत भारताचा विजय साकारला. संजू सॅमसनने देखील 25 चेंडूत 39 धावांची खेळी केली.