इस्रोचा काऊंटडाऊन देणारा आवाज हरपला

शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं निधन

। चेन्नई । वृत्तसंस्था ।

भारताच्या चांद्रयान-3 मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं वयाच्या 64 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. इस्रोच्या चांद्रयान-3 मिशन लाँचच्या काऊंडाऊन मागील आवाज त्यांचा होता.

30 जुलैला केलं शेवटचं काऊंटडाऊन
इस्रोच्या प्रक्षेपणपूर्व काऊंटडाऊनच्या घोषणांमागील एन. वलरामथी या आवाज होत्या आणि चांद्रयान मोहिमेशिवाय 30 जुलै रोजी रॉकेट लाँचिंगवेळी त्यांनी शेवटची घोषणा केली, ज्यात एका समर्पित व्यावसायिक मोहिमेचा भाग म्हणून PSLV-C56 रॉकेटने 7 सिंगापूर उपग्रहांचं लाँचिंग केलं. एन. वलारमथी या गेल्या सहा वर्षांपासून सर्व लाँचसाठी काऊंटडाऊन घोषणा करत होत्या.
हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन
शनिवारी (दि.3) संध्याकाळी चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं, त्या काही काळापासून अस्वस्थ होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने इस्रोमधील शास्त्रज्ञांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Exit mobile version