| चेन्नई | वृत्तसंस्था |
भारतात सध्या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या प्रत्येक यशाच सेलिब्रेशन सुरु आहे. त्याचवेळी इस्रोमधून एक दु:खद बातमी आलीय. भारताच्या वैज्ञानिक वलारमथी यांचं कार्डिएक अरेस्टने निधन झालं. इस्रोच्या जितक्या पण मोहीमा झाल्या, त्यात काऊंटडाऊनच्या दरम्यान जो आवाज ऐकू यायचा, तो वलारमथी यांचा होता. पण आता हा आवाज पुन्हा कधीच ऐकू येणार नाही.
चांद्रयान-3 हे वैज्ञानिक वलारमथी यांचं शेवटत मिशन ठरलं. 14 जुलैला श्रीहरिकोटा येथून मिशन चांद्रयान-3 ची सुरुवात झाली होती. त्यावेळी कक्षात जो आवाज ऐकू यायचा, तो वलारमथी यांचा होता. त्या तामिळनाडूच्या अलियायुर येथे रहायच्या. वलारमथी यांनी शनिवारी चेन्नईमध्ये अखेरचा श्वास घेतला. इस्रोचे माजी डायरेक्टर पी.वी. वेंकटकृष्णन यांनी ट्विट करुन वलारमथी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं.
श्रीहरिकोटा येथे इस्रोच्या पुढच्या मिशन्समध्ये आता काऊंटडाऊन दरम्यान वलारमथी मॅडमचा आवाज ऐकू येणार नाही. चांद्रयान-3 मिशन त्यांची फायनल असायनमेंट होती. हा खूप दु:खद क्षण आहे. सोशल मीडियावर अनेकांनी वलारमथी यांना श्रद्धांजली वाहिली. इस्रोमधील त्यांच्या योगदानासाठी सलाम केला. प्रत्येकजण त्यांच्या आवाजाचं कौतुक करायचा. प्रत्येकासोबत त्यांचं एक कनेक्शन बनलं होतं.