| मुंबई | प्रतिनिधी |
आता जर मुख्यमंत्री झालो तर बरं होईल, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे वारंवार सांगत आहेत. पण आता तसं शक्य नाही. कारण जे आमचं ठरलं आहे ते ठरलं.. त्याच्यात आता बदल नाही, असे शिंदे गटाचे प्रतोद आ.भरत गोगावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या चर्चा होत आहे. अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आपल्याला मुख्यमंत्री होण्यास आवडेल आणि त्यासाठी 2024 गरज नाही, असे वक्तव्य खुद्द अजित पवार यांनी केले आहे. मात्र यावरुन अनेक प्रतिक्रिया येत असताना अजित पवार यांना आता मुख्यमंत्री होणं शक्य नसल्याचं भरत गोगावले यांनी म्हटले आहे. आमचं ठरलं असून, त्यात काही बदल होणार नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, अजित पवार राष्ट्रवादीचा गट घेऊन सत्तेत आल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते.
एका दिलेल्या मुलाखतीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं तर डोईजड होतील अशी शंका पक्षातील नेत्यामध्ये असावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. असा टोलाही देसाई यांनी लगावला.
अजितदादा मुख्यमंत्री होणे अशक्य- आ.गोगावले
