ज्येष्ठ नागरीकांनी समाजामध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे – पंडीत पाटील

पायेनाड ज्येष्ठ नागरीक संघाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा,
सामाजिक-राजकीय-शासकीय मान्यवरांची उपस्थिती

। पेझारी। वार्ताहर ।
पोयनाड ज्येष्ठ नागरीक संघामध्ये विविध कार्यालयामध्ये विविध क्षेत्रांतील नामवंत सदस्य सहभागी असल्यामुळे या अनुभवी ज्येष्ठ नागरीकांनी समाजामध्ये प्रबोधन करणे गरजेचे आहे. असे मत ज्येष्ठ नागरीक संघ पोयनाड यांचे वर्धापन दिन उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. सदरचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर रोजी पोयनाड येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर व सचिव विधिसेवा प्राधिकरण अलिबाग श्री. अमोल शिंदे, रायगड जिल्हा परिषद सदस्या तथा माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, स्वामी समर्थ वृद्धाश्रमाचे संचालक अ‍ॅड.जयेंद्र गुंजाळ, ज्येष्ठ नागरीक संस्थापक आप्पा दांडेकर, संघाचे अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष अरुण राऊत, सचिव दामोदर पाटील, माजी अध्यक्ष के.आर.पाटील, सहसचिव मधुकर राऊत, जयवंत पाटील, माजी अध्यक्ष राजाभाऊ हळदवणेकर आदी. अनेक मान्यवर उपस्थित होते. या वर्धापनदिनाचे उद्घाटन जिल्हा न्यायाधिश अमोल शिंदे व इतर मान्यवरांचे उपस्थित दिप प्रज्वलन करून प्रसंगी न्यायालय विधिसेवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा व आपल्यासाठी या प्राधिकरणामार्फत मोफत सल्ला, मोफत वकील स सर्वतोपरी माहिती मिळेल असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

याप्रसंगी चित्रा पाटील, पोलीस निरीक्षक नरेंद्र बेलदार, अ‍ॅड.जयेंद्र गुंजाळ, आदि मान्यवरांनी विस्तृत यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ नागरीक संघातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता संस्थेचे संस्थापक आप्पा दांडेकर, अध्यक्ष महादेव पाटील, उपाध्यक्ष अरूण राऊत, सचिव अ‍ॅड. डी.एम् पाटील, कार्यक्रमासाठी कार्यकारिणी सदस्य यांनी परिश्रम घेतले

Exit mobile version