मुलांना शालेय शिक्षणाबरोबर कलागुणांनाप्रोत्साहन देणे गरजेचे: डॉ. चव्हाण  

Exif_JPEG_420

आगरदांडा | वार्ताहर |

मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन वसंतराव नाईक महाविद्यालयाचे उपप्राचार्य  तथा सत्यम युवक मंडळ ग्रामस्थ अध्यक्ष डॉ. विश्वास चव्हाण यांनी केले. ते सत्यम युवक मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या बक्षीस समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी सत्यम युवक मंडळ अध्यक्ष -दिपेश राजपुरकर , वसंतराव नाईक महाविद्यालयाचे उपप्राचार्य सत्यम क्रिडा मंडळाचे तथा ग्रामस्थ अध्यक्ष डॉ. विश्वास चव्हाण,माजी अध्यक्ष- प्रकाश चव्हाण, अनंत म्हसळकर, सचिव-स्वप्निल म्हसळकर , उपाध्यक्ष – सुमीत दर्ग, खजिनदार -समिर भाटकर, अरुण म्हसळकर, प्रसन्न जाळगावकर,माजी उपाध्यक्ष- दिपक राजपुरकर, महिला अध्यक्ष- वृषाली चव्हाण, पुष्पा दर्ग,अमिता कोतवाल, उपाध्यक्ष प्राजक्ता चव्हाण,  युवक क्रिडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होते.  

Exit mobile version