मराठी शाळा वाचवणे पालकांचीच जबाबदारी- हलडे

| मुरूड-जंजिरा | वार्ताहर |

पालकांनीच मराठी शाळा वाचल्या पाहिजेत किंबहुना ती त्यांची जबाबदारी आहे. असे महत्वपूर्ण प्रतिपादन नांदगावच उपसरपंच अस्लम हलडे यांनी केले. रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा नांदगाव नं.1 ,2 ,3 व उर्दू शाळांच्या बक्षीस वितरण समारंभाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

नांदगाव मराठी शाळा नं 1 सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली पवार होत्या. तर ग्रामपंचायत सदस्या सेजल घुमकर, शामल रावजी, शमीम अनवारे, सदस्य विक्रांत कुबल, लक्ष्मण दाभणे, माजी शिक्षक अजित पोतदार, निलेश नागावकर, वृषाली जोशी, रविंद्र भोबू, मेहरुन्निसा चिपळूणकर, हरिभाऊ शेळके, प्राची दळवी, अंकिता मळेकर, मधुकर चोरघे, सुजाता शहापुरकर, नितेश भणगे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी दुर्वा राजेंद्र पवार (शाळा नं.1) निशांत जयेश गायकर (शाळा नं. 2) वैभवी विजय अग्रावकर (शाळा नं. 3) कु.आयेशा रियाज बंदरकर (उर्दू शाळा) या विद्यार्थ्यांची आदर्श विद्यार्थी 2021/22 म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्यासह एकूण 136 विद्यार्थ्यांना विविध प्रकारची बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांना गौरविण्यात आले. खोत सर व पोतदार गुरुजी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन विठ्ठल रघुनाथ वडते व विजय प्रकाश चांदोरकर यांनी केले. मुख्याध्यापिका अंजली दळवी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सारिका संदीप वाटवे, गीता गणेश भगत, संगीता उदय खानावकर, रुपेश राम बांद्रे, शरद श्रीधर सुरवसे, मंगेश नरसिंह गोयजी,जयवंत नथुराम देडगे आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version