आमदारांचे हक्क माहित नसलेले लोकप्रतिनिधी हे दुर्दैव – आ.जयंत पाटील यांची टीका

पिटकिरीत समाजमंदिराचे लोकार्पण
| अलिबाग | प्रतिनिधी |
आमदारांचे हक्क, अधिकारी ज्यांना कळतात तोच खरा प्रतिनिधी असतो. प्रश्‍न कुठल्या माध्यमातून मांडायचे हे ज्या आमदाराला अजून कळत नाही, सभागृहांच्या नियमांचे पुस्तक न वाचणारे आमदार होत आहेत. जमीन लाटणारे लोकप्रतिनिधी होत आहेत, अशी उपहासात्मक टीका शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील यांनी पिटकिरी, ता.अलिबाग येथे शनिवारी केली.
जयंत पाटील यांच्या आमदार फंडातून कुसुंबळे ग्रा.पं.हद्दीतील पिटकिरी येथे उभारण्यात आलेल्या स्व.अनंत बाबूराव कदम समाजमंदिराचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड.आस्वाद पाटील, माजी जि.प. चित्रा पाटील, माजी पं.स.सभापती प्रमोद ठाकूर, माजी पं.स.सदस्या रचना म्हात्रे, सुनील पिंगळे, अमृत पाटील, शैलेश पाटील, यशवंत पाटील, विलास म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आ.जयंत पाटील यानी आपल्या भाषणातून पिटकिरी गावाच्या इतिहासाची माहिती दिली. पिटकिरी गाव हे शेकापचा बालेकिल्ला, शेकापचे खारेपाटातील राजकारण हे सांबरी, पिटकिरी येथून चालायचे, शेतकरी चळवळीचे पिटकिरी गाव म्हणूनही ते ओळखले जायचे. याच गावात काँम्रेड डांगेची सभा झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. याच पिटकीरी गावाने नाटकाची परंपरा जपली आहे. पिटकरी गावचे आध्यात्मक गुरु यांच्या कार्याचे कौतूक केले. नाटक, भजन, कीर्तन परंपरा त्यांनीच रुजविली याचे स्मरणही जयंत पाटील यानी केलेय पिटकिरी गावातील अनेकजण मुंबईत नोकरी, धंद्यामुळे वास्तव्यास आहेत.पण ते तेथे विविध पक्षांची कामे करतात पण गावाकडे आले की फक्त शेकापचेच काम करतात असेही आ.जयंत पाटील यानी आवर्जून नमूद केले. येथील मुंबईकर नेहमीच शेकापच्या मागे राहिला आहे, असेही ते म्हणाले.
पेझारी, नागोठणे रस्त्यासाठी आम्ही मोर्चे काढले, संघर्ष केला त्यामुळे प्रशस्त रस्ता तयार झाला आहे. हाच रस्ता रेवस ते नागोठणे पर्यंत चौपदरी व्हावा यासाठी मी प्रयत्न केला आहे. तालुक्यात 35 कोटींचे रस्ते मंजूर करुन घेतले आहेत. असे ते म्हणाले. विरोधकांचा समाचार घेताना त्यांनी सांगितले की, आपण हप्ते मागत नाही, टक्केवारी घेत नाही. त्यांचा व्यवसाय काय, उत्पन्न काय, फक्त हप्ते मागत फिरणे अशी टीकाही त्यानी केली. उद्या होणारी मुंबई येथे होणार आहे.त्यामध्ये आपले आगरीपण टिकले पाहिजे. एकजूट राहिली पाहिजे. एकत्र राहिलात तरच टिकून राहाल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी सुनील पाटील यांच्या नाट्य पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

Exit mobile version