37 हजारांचा मुद्देमाल जप्त

पनवेल | वार्ताहर |
गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर व तळोजा येथे छापा टाकून सुमारे 37 हजार 460 रुपयाचा सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थ हस्तगत करण्यात आला आहे.
खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळोजा गाव, स्टार हॉटेलच्या मागे, सुभान पटेल याच्या रुम मध्ये खारघर, नवी मुंबई येथे छापा टाकला. छापा टाकला असता रु.37,460/- किंमतीचा विमल पानमसाला, सुंगधी तंबाखू, गुटखा मिळून आल्याने आरोपी मेमुजफ्फरमुराद धोंगरे, वय 29 वर्षे, यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Exit mobile version