अय्यर नियमभंगाचा गुन्हेगार

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर यंदाच्या आयपीएल हंगामातील नियमभंगांचा पहिला गुन्हेगार ठरला आहे. गुजरात टायटन्सविरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरला संथ षटक गती राखल्याप्रकरणी आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या खिशातून तब्बल 12 लाख रूपये कापण्यात आले आहेत.

हा सामना चंदीगडमधील न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाला होता. वक्तव्यात पुढे सांगण्यात आलं की, हा या संघाचा हंगामातील पहिलाच नियमभंग असल्याने आयपीएल कोड ऑफ कंडक्टच्या आर्टिकल 2.22 अंतर्गत अय्यरला 12 लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

श्रेयस अय्यरवर कमी षटक गती राखल्याबद्दल कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीदेखील अय्यरला बीसीसीआयच्या शिक्षेचा सामना करावा लागला होता. एकदा नाही तर दोनदा हा सामना करावा लागला होता. पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सविरूद्ध निसटता विजय मिळवला. गुजरातने 162 धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात खेळताना पंजाब किंग्जने 2 बाद 110 धावांपर्यंत मजल मारली होती. दुसऱ्या विकेटसाठी प्रभसिमरन सिंग आणि कूपर कॉन्नॉली यांनी 77 धावांची भागीदारी रचली होती. मात्र यानंतर पंजाबचा डाव घसरला अन्‌‍‍ त्यांची अवस्था 6 बाद 118 धावा झाली. मात्र झेव्हियर बार्टलेटने डाव सावरत पंजाबला विजयाचं खातं उघडून दिलं. त्याने 44 चेंडूत 72 धावांची खेळी केली. इंम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणाऱ्या गुजरातच्या प्रसिद्ध कृष्णाने 13 व्या षटकात गोलंदाजी करत मोठा धकमा केला. त्याने तीन धावात तीन विकेट्स घेतल्या.

Exit mobile version