जे.जे. पाटील सरांचे कार्य प्रेरणादायी; माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे गौरवोद्गार

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
माध्यमिक शाळा शिहुचे मुख्याध्यापक जे.जे. पाटील हे आदर्श, शिस्तप्रिय व विद्यार्थी प्रिय म्हणून सर्वपरिचित राहिले. त्यांचे एकूणच जीवनकार्य आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी काढले. जे जे पाटील व माई पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला. यावेळी धैर्यशील पाटील बोलत होते. या कार्यक्रमास माजी आ. धैर्यशील पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. सरकार्यवाहक तथा शेकापचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, शिक्षण प्रसारक मंडळ शिहूचे अध्यक्ष डॉ. रोहिदास शेळके, उपाध्यक्ष के.के. कुथे, कार्याध्यक्ष पांडुरंग गदमळे, र.य. पाटील, बाळाराम पाटील, हशा भोईर, वेठ्या खाडे, जीवन शेळके, सचिव विजय पाटील आदींसह माजी सभापती संजय भोईर, सभापती मनीषा भोईर, युवा नेते प्रसाद भोईर, लक्ष्मण खाडे संदीप पाटील, उद्धव कुथे आदींसह सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नेतेमंडळी, आजी-माजी विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी धैर्यशील पाटील, अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्यासह रोहिदास शेळके, कामगार नेते संदीप पाटील, जीवन शेळके, र.य. पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच त्यांच्या पुढील निरोगी, दीर्घ आयुष्य व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Exit mobile version