जे. एस. एम चे पदवी प्रमाणपत्र वितरण

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

जे. एस. एम. महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2021-22 साठीचा पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जेएसएमचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील, सेक्रेटरी गौरव पाटील, प्राचार्य डॉ. अनिल पाटील, उपप्राचार्य डॉ. नीळकंठ शेरे आदि मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. गौतम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यासंबधीची उद्घोषणा केली. यावेळी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारण्याचा संस्मरणीय अनुभव प्राप्त झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी या सोहळ्याच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास महाविद्यालायातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. जयेश म्हात्रे, पदवी प्रमाणपत्रांचे वाचन प्रा. सुरभी वाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. श्‍वेता पाटील यांनी केले. शैक्षणिक वर्ष 2021 -22 च्या पदवी, पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असून संबंधित विद्यार्थ्यांनी दि. 20 मे 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत ती घेऊन जावीत, अन्यथा संबंधित विद्यार्थ्यांना आपली पदवी प्रमाणपत्रे विद्यापीठात जाऊन घ्यावी लागतील असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे.

Exit mobile version