जे. एस. एम. महाविद्यालयात स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन

। अलिबाग । विशेष वार्ताहर ।
सध्याच्या स्पर्धात्मक युगात शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरतेच मर्यादित न राहता त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. प्रतिमा, आलेख, फ्लो चार्ट, व्हिडीओ इत्यादी स्मार्ट तंत्रज्ञान घटकांचा वापर करून व्हिज्युअल लर्निंग हे अत्यंत प्रभावी मानले जाते आणि विद्यार्थ्यांना संकल्पना लवकर समजून घेण्यास मदत होते. त्या अनुषंगाने जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी महाविदयालयात विद्यार्थ्यांना सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा निश्‍चय केला आहे.

अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आपली पत्नी नमिता नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीमधून महाविदयालयात तयार करण्यात आलेल्या स्मार्ट क्लासरूमचे उद्घाटन गुरुवार (दि.23) जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयामध्ये स्मार्ट क्लासरूम उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी अध्यक्ष अ‍ॅड. पाटील व अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे सर्व शिक्षकांच्या वतीने आभार मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version