जे.एस.एम. कॉलेजचा भारती विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालय व नवी मुंबई येथील भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि रिसर्च यांच्यात सोमवारी एक शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. अनेक चांगली महाविद्यालये व संस्था तसेच औद्योगिक संस्था यांच्याबरोबर महाविद्यालयाचा संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाचा एक भाग म्हणून जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांच्या संकल्पनेतून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि रिसर्चच्या वतीने संचालिका डॉ. अंजली कळसे यांनी आणि जे.एस.एम. महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या केल्या. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील व भारती विद्यापीठाच्या वतीने संचालिका डॉ. अंजली कळसे यांनी सामंजस्य करार एकमेकांना हस्तांतरित करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटतर्फे डॉ. मोना सिन्हा, प्रा.डॉ.रजनी माथूर, प्रा.प्रियेता प्रियदर्शनी, प्रा.मकरंद पोळ हे उपस्थित होते. जनता शिक्षण मंडळाचे संचालक रघुजीराजे आंग्रे व शारदा धुळप, जे.एस.एम. महाविद्यालयातील प्रा.श्‍वेता मोकल, प्रा.अश्‍विनी दळवी, प्रा.डॉ.सोनाली पाटील, प्रा.डॉ.मिनल पाटील, प्रा.डॉ.जयश्री पाटील, प्रा.जयेश म्हात्रे हेही यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version