। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील नारंग आळी, भेंडखळ येथील बालमित्र नवरात्रौत्सव मंडळातर्फे नुकतेच निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. या कविसंमेलनात आगरी कवितांचे बादशहा पुंडलिक म्हात्रे, राजेंद्र नाईक, प्रबोधन कवी प्रकाश ठाकूर, भगवान ठाकूर आदींनी आपल्या कविता सादर केल्या. आगरी बोली भाषेतील कवितांना उपस्थित ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. सर्व उपस्थित मान्यवर कवींचा मंडळातर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष वैजनाथ म्हात्रे, उपाध्यक्ष बळीराम घरत, सचिव भालचंद्र घरत, खजिनदार विलास पाटील, जगदीश पाटील, प्रदीप पाटील (अण्णा) आदींनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्ते यशवंत म्हात्रे आदी उपस्थित होते. राजेंद्र नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.







