15 जानेवारीला पद्मदुर्गचा जागर

। कोर्लई । वार्ताहर ।
पद्मदुर्ग जागर व संवर्धन समितीची सभा नुकतीच मुरुडमध्ये शहरातील माळी समाजाच्या हॉलमध्ये समितीचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत पद्मदुर्ग स्वच्छता मोहीम दि.28 डिसेंबर रोजी व पद्मदुर्ग जागर कार्यक्रम दि.15 जानेवारी 2023 रोजी घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

यादिवशी सकाळी सात वाजता गडावर पालखीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर अल्पोपहार तसेच दुपारी महाप्रसादाचा लाभ व बोटसवारी यासाठी गडप्रेमींना रुपये 100/- देणगी स्वरूप कूपन दिले जाईल. अधिक माहितीसाठी समितीचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर 8087183867, 9423822877 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version