। खांब-रोहे । वार्ताहर ।
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिव शाहू महाराज सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी ‘जागर पर्यावरणाचा’ हा ऑनलाईन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला.
सदर कार्यक्रम हा झूम व मोरल महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह घेण्यात आला. कार्यक्रमात विशेष आकर्षण सुप्रसिद्ध बाल अभिनेत्री आर्या घारे हिने पर्यावरणाचे महत्त्व सांगून तिच्या बीज संकलन चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रमुखवक्ते वनश्री पुरस्कार विजेते डॉ.महेंद्र घागरे यांनी पर्यावरण, बीज संकलन व वृक्ष लागवड किती महत्वाचे आहे हे पटवून दिले व त्यांना आलेले अनुभव कथन केले. कार्यक्रमात कवी मारुती कटकधोंड यांनी कविता सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात संघटनेचे प्रवक्ते अक्षय इळके, कॅसमॅस पॉलिटेक्निकचे प्रा.डॉ.गणेश डोंगरे, जानकीराम नलावडे, रोहित जाबा यांचे मार्गदर्शन लाभले. प्रास्ताविक आयोजक अध्यक्ष महेश तळेकर यांनी कमलेश राजकाडे यांनी सूत्रसंचालन तर पोलीस पाटील संजय गगे खरिडकर यांनी आभार मानले. या ऑनलाईन कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून मोठ्या संख्येने मान्यवरांनी सहभाग नोंदविला.