। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील चिल्हे येथे धाक्सुद मंडळ चिल्हे आयोजित कोलाड विभागीय कबड्डी स्पेर्धेत जय बजरंग आंबेवाडी संघ अंतिम विजेता ठरला आहे. रोहा तालुक्यातील धाक्सुद चिल्हे युवक मंडळांनी आयोजित केलेल्या कोलाड विभागीय कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ग्रामस्थ नागरिक यांच्या विशेष सहकार्यातून आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीची अटीतटीची लढत जय बजरंग आंबेवाडी व गावदेवी बाहे यांच्यात हा सामना अतिशय रंगदार झाला. या लढतीत अखेर अंतिम विजयी म्हणून जय बजरंग आंबेवाडी संघ ठरला तर द्वितीय क्रमांकावर गावदेवी बाहे संघाला समाधान मानावे लागले .
या कबड्डी खेळाचा शुभारंभ कोलाड, खांब, देवकान्हे विभागातील युवकांचे स्फूर्तीस्थान न.शि.प्र.मं. खांबचे अध्यक्ष तसेच गोवे ग्राम पंचायतीचे सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आंबेवाडी जिप गणाचे अध्यक्ष नरेंद्र जाधव, खांब विभाग शेकाप ज्येष्ठ नेते मारुती खांडेकर, नारायण महाराज महाडिक, विनायक महाडिक, ठमाजी महाडिक, सहदेव महाडिक, अनिल महाडिक, रायगड भूषण डॉ श्यामभाऊ लोखंडे, मंगेश लोखंडे, गाव कमिटी अध्यक्ष सुधीर लोखंडे, रवींद्र लोखंडे, पोलीस पाटील गणेश महाडिक, आदर्श शिक्षक नंदकुमार मरवडे, असोसिएशनचे अध्यक्ष महेश ठाकूर, तुकाराम महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत अंतिम विजेता आंबेवाडी संघ तर उपविजेता बाहे संघ तसेच तृतीय क्रमांकचे मानकरी सापया वरसगाव व चतुर्थ क्रमांक धाक्सुद चिल्हे संघांनी पटकावले आहे. तर स्पर्धेतील मालिकावीर आंबेवाडी संघाचा अखिलेश गाडगे उत्कृष्ट चढाई बाहे संघाचा विजय माठल तर उत्कृष्ट पकड वरसगाव संघाचा नितेश सानप हे मानकरी ठरले असून विजय संघाना तसेच खेळाडूंना पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
