जय बापदेव संघाने जिंकला ‘भंडारी चषक’

मुरुड । वार्ताहर ।

1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरुड तालुक्यातील ग्रामस्थ डोंगरी सुभा संस्था आयोजित भव्य ‘भंडारी चषक’ कबड्डी स्पर्धेतील अटीतटीच्या अंतीम सामन्यात आगरदांड्याच्या जय बापदेव संघाने खारीकवाड्याच्या वादळ संघाचा पराभव करीत मानाचा ‘भंडारी चषक’ जिंकला व 21000 रुपये रोख रकमेचे पारितोषिक मिळवले. उपविजेत्या वादळ संघाला 15000 रुपये रोख व चषक, जय हनुमान खार आंबोली संघाला तृतिय क्रमांकाचे तर जय हनुमान डोंगरी संघाला चौथ्या क्रमांकाचे प्रत्येकी रु.पाच हजार रोख व आकर्षक चषक देऊनगौरविण्यातआले.स्पर्धेतील शिस्तबध्द संघ म्हणून खार आंबोलीच्या गावदेवी संघाची निवड करण्यात आली. उत्कृष्ट खेळाडू म्हणून सिद्धेश पिंगळे,उत्कृष्ट चढाईपटू जयेश यादव,तर उत्कृष्ट पकड दिनेश गिरणेकर यांची निवड करुन त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उदघाटन नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर व ॠषीकांत डोंगरीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी स्नेहा पाटील,स्मिता खेडेकर,नागाव सरपंच निखिल मयेकर, हर्षदा मयेकर, मच्छिंद्र नाईक, वृशाली डोंगरीकर, उद्देश वाडकर, राजन वाडकर,प्रशांत जाधव,राकेश पाटील,निवास नाईक,मंगेश पुलेकर,श्रीकांत सुर्वे, मोहन करंदेकर, मोहन पाटील,नंदकुमार ठाकुर, संदिप कमाने,विकास घाग, अमित गायकर,नितीन वारगे, संतोष भोईर डोंगरी सुभा संस्थेचे जितेंद्र खेऊर,संजय भोसले,प्रयाग भोसले,रविंद्र नाईक, संदिप नाईक, मंगेश भोसले, संदेश डपे, विजय खेऊर, सतिश कोरगावकर, संदिप नरे आदीही उपस्थित होते.

Exit mobile version