| पाली | वार्ताहर |
सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या व श्री काल भैरवनाथ कबड्डी मंडळ नाडसुर यांच्या वतीने प्रथमच तालुका स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन शनिवार दि.30 रोजी करण्यात आले होते.
या स्पर्धेत तालुक्यातील 32 नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमीनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत जय हनुमान जय हनुमान रासळ एन विरुद्ध श्री भैरीनाथ वावे या संघात झाली .या लढतीत जय हनुमान रासळ एन हा प्रथम क्रमांकाच मानकरी ठरला या संघास रोख रक्कम 10 हजार रु व आकर्षक चषक तर द्वितीय क्रमांक श्री भैरीनाथ वावे या संघास रोख रक्कम 7 हजार रु व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा रणधुरंधर स्पोर्ट्स क्लब पाली तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जय हनुमान रासळ आर या दोन्ही संघास प्रत्येकी 5 हजार रु व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ जय भवानी उसाळे हा संघ ठरला.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू वैभव खाडे (रासळ), उत्कृष्ट चढाई विशाल मस्के (वावे), तर उत्कृष्ट पक्कड अजय खाडे (रासळ) या खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.






