बाल्या नाच स्पर्धेत जय हनुमान नाच मंडळ प्रथम

| चणेरा | वार्ताहर |
न्हावे येथे आयोजिक करण्यात आलेल्या बाळे नाच स्पर्धेत जय हनुमान नाच मंडळ बेणसेवाडी, पेण यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच व्दितीय क्रमांक गावदेवी नाच मंडळ सुडकोळी अलिबाग तृतीय क्रमांक आबाची नृत्य कला, मंच रोहणी म्हसळा, चतुर्थ क्रमांक जय हनुमान नाच मंडळ वाघोली पोयनाड यांनी पटकाविला. जय हनुमान मित्र मंडळ, आयोजीत नवरात्र उत्सवाचे निमित्ताने न्हावे येथे जय हनुमान मित्रमंडळ, भायतांडेल आळी व ग्रामपंचायत न्हावे यांचे सयुक्त विदयमान नाचांच्या भव्य स्पर्धा आयोजीत करण्यता आल्या होते. यावेळी सरपंच राजेश्री शाबासकर ,रवी शाबासकर ,महादेव शाबासकर, सुरेश पोसतांडेल, विकास भायतांडेल, विजय कासकर, सदानंद पाटील, रमेश न्हावकर, जयेश पाटील, मनोज तांडेल, प्रमोद कासकर, मोहन न्हावकर,लिलाधर भायतांडेल, गोंविद भायतांडेल,हेमंत भायतांडेल, बिपीन झुरे व न्हावे, नवखार, व सोनखार ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

प्रथम क्रमांकास 15 हजार रोख व चषक, व्दितीय क्रमांकास 8 हजार 888 रूपये व चषक, तृतीय 4 हजार 444 रूपये रोख व चषक, चतुर्थ क्रमांकास 2 हजार 222 रूपये रोख व चषक देण्यात आले. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व नाच मंडळाना उत्तेजनार्थ रोख रक्कम रूपये एक हजार व स्मृती चिन्ह देण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून विकास भोईर, धर्मा सरलेकर, सत्यवान तांडेल, भास्कर भोईर, यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन प्रदीप भोईर यांनी केले.

Exit mobile version