। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
भैरी भवानी क्रीडा मंडळ शिळोशी आणि सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने कै.सचिन भोईर स्मृती चषकाचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन शिळोशी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम सामना जय हनुमान रासळ विरुद्ध स्वयंभू हनुमान चिवे या दोन संघांमध्ये झाला. या अटीतटीच्या अंतिम लढतीत रासळ हा संघ विजय झाला. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक रासळ या संघास रोख रक्कम 11 हजार व चषक, द्वितीय क्रमांक चिवे 7 हजार व चषक, तृतीय क्रमांक भैरवनाथ वावे 5 हजार व चषक, चतुर्थ क्रमांक खडसांबळे 5 हजार व चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वात्कृष्ट खेळाडू निलेश लहाने, उत्कृष्ट चढाई स्वप्नील भिलारे तर उत्कृष्ट पक्कड किरण मस्के यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण भैरी भवानी क्रीडा मंडळ शिळोशीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळाच्या हस्ते देण्यात आले.