शेकाप पुरस्कृत जय मल्हार चषक क्रिकेट स्पर्धा

हाशिवरेचा आवनी स्पोर्टस् विजेता

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा हरेश्‍वर मैदानात थेरोंडा वर्सोलपाडा जय मल्हार क्रिकेट संघाचे वतीने शेकाप पुरस्कृत जय मल्हार चषक 2023 टेनिस बॉल मर्यादीत षटकांचे क्रिकेट स्पर्धेत हाशिवरे येथील आवनी स्पोर्टसने अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेत व्दितीय क्रमांकाचे मानकरी विजय मार्तंड थेरोंडा (ब) तृतीय क्रमांक विजय मार्तंड थेरोंडा (अ), चतुर्थ क्रमांक सुपरफास्ट आग्राव यांनी पटकाविले. या स्पर्धेचा उत्कृष्ट फलदांज विजय मार्तंड थेरोंडा (ब) महेश जंगली, उत्कृष्ट गोलदांज सुपरफास्ट आग्राव संघाचा नागेश सरदार, तर मालिकावरी आवनी स्पोर्टस् संघाचा प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.

थेरोंडा जय मल्हार क्रिकेट संघ आयोजीत शेकापक्ष पुरस्कृत जय मल्हार चषक स्पर्धेचा बक्षिस वितरण महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी तालुका शेकापक्ष पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, रेवदंडा सरपंच मनिषा चुनेकर, ग्रा.प.सदस्य संदीप खोत, माजी ग्रा.प. सदस्य सुरेश खोत, शेकापक्षाचेे जेष्ठ कार्यकर्ते मुज्जफर मुकादम, शरद वरसोलकर, निलेश खोत आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती होती.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये चित्रलेखा पाटील पुरस्कृत 25 हजार रूपये रोख व भव्य जय मल्हार चषक, व्दितीय क्रमांकास नागाव ग्रा.प. सरपंच निखिल मयेकर पुरस्कृत 15 हजार रूपये रोख व भव्य जय मल्हार चषक, तृतीय क्रमांकास निलेश खोत पुरस्कृत 5 हजार रूपये रोख व भव्य जय मल्हार चषक, चतुर्थ क्रमांकास मंजुळा अँण्ड विठ्ठल फिशरील पुरस्कृत 5 हजार रूपये रोख व भव्य जय मल्हार चषक, तसेच उत्कृष्ट फलदांजास, गोलदांज व मालिकावीर यांना उपस्थित मान्यवराचे हस्ते चषक प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेत समालोचनाचे काम शैलेश टिवळेकर, निखिल बनिया, सौरभ भुरे, वेदांत कटंक यांनी केले तर पंचाचे काम पुरूषोत्तम भगत, संतोष सुडकू यांनी पाहिले, स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वर्सोलपाडा जय मल्हार क्रिकेट संघाचे सर्व संघ खेळाडूनी विशेष परिश्रम घेतले

Exit mobile version