। डेहरादून । वृत्तसंस्था ।
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह महत्त्वाची रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र पाठवणार्याने स्वत:ला जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर सलीम अन्सारी असल्याचे म्हटले आहे. धमकीचे पत्र मिळताच पोलीस विभागाने तपास सुरू केला आहे. तर जीआरपी आणि आरपीएफ अलर्ट झाले असून, सर्व रेल्वे स्थानकांवर सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच प्रत्येक संशयित प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात येत आहे. धमकीचे पत्र गांभीर्याने घेत रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत.