जाखडी नृत्य स्पर्धेत ‘लोककलेचा जागर’

म्हसळ्यातील काळभैरव कलापथकाची बाजी
| दिघी | वार्ताहर |

मुंबई येथील मराठी साहित्य संघ येथे नुकताच पार पडलेल्या जाखडी नृत्य स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील कलापथकाने प्रथम क्रमांक पटकावून कोकणातील प्रसिद्ध ‘बाल्या डान्स’ या लोककलेचा जागर केलं आहे. यावेळी कलासंचांच्या उत्कृष्ठ सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

म्हसळा ताम्हाणे-करंबे येथील श्री शिवशक्ती नाच मंडळतर्फे चर्नीरोड, मुंबई येथे जाखडी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत तालुक्यातील एकूण सहा कलापथकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम लवकरच येणार्‍या गणेशोत्सवाची जय्यत तयारी असून, नोकरीनिमित्ताने शहरांकडे गेलेल्या अनेकांना मनोरंजनाची मेजवानी ठरली. यातून पारंपरिक संस्कृती जपण्याचा वसा जाखडी नृत्याच्या रुपाने मुंबईवासियांना पाहायला मिळाला.

रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा ‘बाल्या डान्स’ या स्पर्धेत काळसूरी गावच्या श्री काळभैरव नृत्य कलापथकाने प्रथम क्रमांक पटकावला. तर द्वितीय क्रमांक मिळवण्यात श्री गणेश कला नृत्यकलापथक खारगाव बुद्रुक यांना यश आले. तसेच तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री आबाजी कलावैभव नृत्यकलापथक रोहिणीगाव यांना मिळाले. यामध्ये प्रथम क्रमांकाचे यश मिळवताना समूहातील जगदीश घोसाळकर, उदयकुमार नाक्ती, लिलाधर घोसाळकर, राजेंद्र घोसाळकर, राहुल नाक्ती, हरेश भोपी, मनोज पेरवी आणि काळसूरी गावच्या युवकांचे अमूल्य योगदान राहिले. द्वितीय व तृतीय क्रमाकांचा मान मिळवणार्‍या ओमकार आगरकर आणि बाळा फुटाक यांनी आपला शाहिरी छाप पाडत कार्यक्रमाला रंगत आणली.

Exit mobile version