‘चला जाणूया नदीला’ अभियानानिमित्त जलदिंडी

| पोलादपूर । प्रतिनिधी ।

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘चला जाणूया नदीला’ हे अभियान जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाड उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूर तहसिलदार दिप्ती देसाई यांच्या सूचनेनुसार सुंदरराव महाविद्यालय पोलादपूर येथे जलदिंडी आणि जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला.

‘चला जाणूया नदीला’ या अभियानानिमित्त महाड महसूल विभाग, शिक्षणाधिकारी, वनविभाग महाड तर्फे हिरवळ प्रतिष्ठान या पर्यावरणप्रेमी संस्थेच्या सहकार्याने पोलादपूर येथील सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, लघुपट सादरीकरण, जलदिंडी व जलपूजन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलादपूरचे परिवीक्षाधीन तहसिलदार विनायक घुमरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भाग्यरेखा पाटील, प्रा.सुनिल बलखंडे, जय अंबुर्ले, गणेश कुरडूनकर, कुणाल गुरव, प्रियंका जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व विशद करणारा आणि जल संवर्धनाचे विविध उपाय स्पष्ट करणारा लघुपट दाखवण्यात आला. या कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या परिसरातच असलेल्या चोळई नदीच्या उगम जलदिंडीचे काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्य फलक आणि स्वच्छ नदी, समृद्ध नदी ! प्रवाही नदी आणते समृद्धी ! हीच वेळ शहाणपणाची, नदीला जाणून घेण्याची ! इत्यादी घोषणांद्वारे जनजागृती केली. जलदिंडीचा समारोप चोळई नदीच्या उगम स्थानावर झाल्यानंतर प्राचार्य डॉ. दीपक रावेरकर व अन्य मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने जगताप, विनायक जगताप श्रीमती गंभीरे यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.

Exit mobile version