। उरण । प्रतिनिधी ।
उरण विधानसभा मतदार संघातील शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकापमध्ये पक्षप्रवेशाची लाट उसळली असून प्रीतम म्हात्रे यांनी आपला जलवा दाखवला आहे. शेकापमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.
दरम्यान, चौक जवळील तीनघर येथील तरुणांनी शिवसेनेतून शेकापक्षात प्रवेश केला आहे. यावेळी प्रणित जाधव, प्रतीक धानिवले, हर्ष मोरे, रोहित गरुडे, राजेश पाटील यांनी शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तसेच, केळवणे जिल्हा परिषद मतदार संघातील कराडे बुद्रुक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचाय विद्यमान सदस्य वेदिका जाईलकर, जिल्हा सरचिटणीस विनोद जाईलकर, भाजपचे विलास शिर्के, गणेश मापनकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुधवारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. याचबरोबर वाशिवली (वडगाव) येथील विजय शिंदे, रमेश भोईर, ज्ञानेश शिंदे, अनंत शिंदे यांनी मनसेनेतून शेकापत प्रवेश केला.
यावेळी शेकापक्षाच्या समितीचे सदस्य जे.एम. म्हात्रे, पनवेल कृउबा समितीचे सभापती नारायण घरत, जे.एम. म्हात्रे इन्फ्रा प्रोजेक्टचे संचालक विपुल म्हात्रे, भास्कर गाताडे, शेकाप कार्यकर्ते विलास गवंडी, पुरोगामी व संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, ज्ञानेश्वर कोंडीलकर, साबीर दळवी, विकास रायकर, कृष्णा शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.