सोमजाई क्रिकेट क्लब भेलोशी संघाची बाजी
| मुंबई | वृत्तसंस्था |
ओम गणेश सेवा मंडळ खुटील मुळगांव ग्रामस्थ मुंबई पुणे आणि ओम गणेश युवा मंडळ यांच्या सहकार्याने श्री जननी सोमजाई फायटर्स खुटील मुळगांव यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री जननी सोमजाई चषक 2024 चे खारघर नवी मुंबई येथे द्वितीय वर्षांचे आयोजन करण्यात आले. गावदेवी प्रसन्न श्री जननी सोमजाई मातेला नारळ अर्पण करून, मैदानांमध्ये श्रीपळ वाढवून, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण अभिवादन करून क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मंडळातील ज्येष्ठ सल्लागार सुरेश मोरे, मुंबईचे सल्लागार विनायक धाडवे, सहसंपर्कप्रमुख एकनाथ सुकुम, मंडळाचे पदाधिकारी युवा मंडळ यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेच्या दरम्यान सदिच्छा भेट दिल्या. यावेळी आयोजकांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. तसेच, देणगीदार, सहकार्य करणार्या सर्वांचे आभार मानून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
खाडीपट्टा टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये नोंदणीकृत झालेल्या 32 नामवंत संघांनी क्रिकेट स्पर्धेला सहभाग नोंदविला होता. यामध्ये विजेता संघ सोमजाई क्रिकेट क्लब भेलोशी अ संघ, उपविजेता शिवतेज आंबवली, तृतीय क्रमांक सोन भैरीदेवी क्रिकेट संघ तेलंगे (अ),चतुर्थ क्रमांक वामने संघ यांनी श्री जननी सोमजाई चषक 2024 या चषकावर नाव कोरले, तसेच तेलंगे संघाचा अनिकेत चव्हाण यांनी उत्कृष्ट फलंदाज तर शिवतेज आंबवली संघाचा नागेश रेवाळे यांनी उत्कृष्ट गोलंदाज किताब पटकावला तर मालिकावीर भेलोशी संघाचा संकेत यादव यांनी किताब पटकावला, यावेळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन निजोजन यशस्वी पार पाडण्यासाठी ओम गणेश सेवा मंडळ खुटिल मुळगांव ग्रामस्थ मुंबई पुणे महाड आणि ओम गणेश युवा मंडळ आणि श्री जननी सोमजाई फायटर्स खुटिल मुळगांव सर्व सदस्यानीं उपस्थित राहून प्रंचड मेहनत घेतली असे श्री जननी सोमजाई फायटर्स खुटिल मुळगांव कर्णधार तथा युवा मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र मोरे यांनी सांगितले.






