जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| रसायनी | प्रतिनिधी |

भोकरपाडा येथील जनार्दंन दुंद्या पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबावर शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचे निधन होताच जगदगुरु रामानंदाचार्यं नरेद्रमहाराजांच्या प्रेरणेने कुटूंबियांनी त्यांचे लक्ष्मी आय बॅक येथे नेत्रदान केले. त्यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि.21) श्रीक्षेत्र उद्धर रामेश्वर येथे होणार असून उत्तरकार्य रविवारी (दि.22) भोकरपाडा येथील राहत्या घरी होणार आहेत. यावेळी सकाळी 10 वाजता संजय वारस्कर यांचे प्रवचन होणार असल्याचे पाटील कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version