| अलिबाग | वार्ताहर |
थेरोंडा (डोर्याचीवाडी) येथील जनार्दन पोशा हले उर्फ जानू तात्या यांचे शनिवार, दि. 26 ऑक्टोबर रोजी वयाच्या 58व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. तलाठी म्हणून ते कार्यरत होते. तसेच उत्कृष्ट क्रिकेटपटू, प्रसिद्ध पखवाजवादक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्या निधनाची बातमी समजताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात आशा हले, मुलगी कॅप्टन कृतज्ञा हले, मुलगा निनाद हले, सून, नातू असे कुटुंब आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि. 27) सकाळी 10 वाजता थेरोंडा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिथे त्यांना ब्रास बँडवर मानवंदना देण्यात आली. त्यावेळी तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व स्तरातील मान्यवर मंडळी, नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.