जंतरमंतरवर शेतकर्‍यांचे आंदोलन

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
दिल्लीत गुरुवारपासून शेतकर्‍यांनी आंदोलन सुरु केले आहे. केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी हे आंदोलन करत आहेत. या शेतकर्‍यांना दिल्लीतल्या जंतर- मंतरवर आंदोलनासाठी परवानगी मिळाली आहे. त्यानुसार शेतकरी ऑगस्टपर्यंत आंदोलन करतील. आंदोलनासाठी वेळही देण्यात आली आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ही वेळ असेल. काही अटींवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापनानं शेतकर्‍यांना आंदोलनासाठी परवानगी दिली आहे.

सर्वत्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी जास्तीत जास्त 200 शेतकर्‍यांना 9 ऑगस्टपर्यंत निषेध करण्यास विशेष परवानगी दिली आहे. दिल्ली पोलिसातील सूत्रांनी सांगितले की, हा मोर्चा सिंघू सीमेवरून निघेल व साडेअकरा वाजेपर्यंत जंतरमंतरवर पोहोचेल. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत शेतकर्‍यांची किसान संसद भरेल.

Exit mobile version