| चिरनेर | प्रतिनिधी |
जासई जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. मनीष अनंत पाटील व जासई पंचायत गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवार निर्मला नरेश घरत व चिर्ले पंचायत गणाच्या उमेदवार प्रियांका मढवी यांना जासई मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतधिक्य देणार असल्याचा निर्धार माजी आमदार मनोहर भोईर व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी व्यक्त केला.
यापुढे बोलताना त्यांनी जासई मतदारसंघातील उमेदवार सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. महाविकास आघाडीला चांगला चांगले उमेदवार लाभले असून, आपण सर्वांनी एक होऊन त्यांना जासई मतदार संघातून जास्तीत जास्त मतदान कसे होईल, यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या उमेदवारांची निशाणी हाताचा पंजा व खटारा असून, या निशाण्या घराघरात पोहोचवा, असे आवाहन केले. प्रचाराला काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र एक करून मतदारांपर्यंत पोहोचून आपण केलेल्या विकासकामांची आठवण करून द्या. तसेच पुढील काळात आपण काय करणार आहोत, याबाबतही मतदारांना समजावून सांगा. जासई मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, रविवारी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रचाराची प्रचार पत्रके नागरिकांना वाटप करून, हाताचा पंजा व खटारा चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
दरम्यान, तालुक्यातील सोनारी, करळ, सावरखार, धुतुम, जासईसह अनेक गावांध्ये रविवारी उमेदवारांचा प्रचार जोरदार झाला. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे महेंद्र घरत, जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील, नरेश घरत, प्रेमनाथ ठाकूर, जासईचे सरपंच संतोष घरत, कंठवलीचे जयराम पाटील, भेंड भेंडखळचे दिपक ठाकूर, रोहिदास पाटील, मेघश्याम कडू, दिनेश कडू, दिनेश पाटील, नारायण तांडेल ,किशोर कडू, रमाकांत कडू, दत्ता कडू, कमलाकर पाटील, किशोर कडू, शेखर कडू, अविनाश कडू, प्रवीण कडू, सुनील कडू, विराज कडू, सूचित कडू, प्रमोद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जासईत आघाडीच्या प्रचाराचा जल्लोष
