ओडिशा किनापट्टीवर आज धडकणार
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बंगालच्या उपसागरात ङ्गजवादफ चक्रीवादळ काही प्रमाणात कमकुवत झाले आहे. हे वादळ उत्तर-पूर्व दिशेने बंगाल किनारपट्टीकडे वळले आहे. वार्याचा वेगही ताशी 11 किलोमीटर इतका कमी झाला आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालसाठी ही दिलासादायक बाब मानली जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाद आज (दि.5) दुपारी ओडिशाच्या पुरी किनारपट्टीला धडकू शकतो. दरम्यान आताही ओडिशाच्या काही भागात जोरदार वार्यासह पाऊस पडत आहे.बंगालमध्येही दिघाजवळील समुद्रात जोरदार लाटा उसळत आहेत.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, वादळ आणखी कमकुवत होऊन पुढील 24 तासांत शांत होऊ शकते, परंतु यादरम्यान पश्चिम बंगालच्या किनारी भागात आणि झारखंडच्या काही भागात पाऊस पडू शकतो. बंगालशिवाय ओडिशा आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.