उपसभापती चषक क्रिकेट स्पर्धेत जय धनकोबा संघाची बाजी

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत मधील धोत्रेवाडी गावच्या रहिवाशी असलेल्या तालुका पंचायत समितीच्या उपसभापती जयवंती हिंदोळा यांच्या माध्यमातून आदिवासी खेळाडूंसाठी उपसभापती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील रामाचीवाडी येथील जय धनकोबा क्रिकेट संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
कर्जत तालुक्यातील धोत्रेवाडी येथे उपसभापती चषकाचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेमध्ये आदिवासी समाजातील एकूण 32 संघ सहभागी झालले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना कशेळे नेरळ रस्त्यावरील जय धानकोबा संघ रामाचीवाडी संघ आणि जांभुळ्वाडी येथील जय गावदेव संघांमध्ये झाला. त्यात रामाचीवाडी संघाने बाजी मारून उपसभापती चषक जिंकला. जांभूळवाडी संघ दुसर्‍या तर अंभेरपाडा संघ तिसर्‍या आणि झुगरेवाडी संघ चौथ्या क्रमांकावर राहिला. विजेत्या संघांचा आणि खेळाडूंचा गौरव कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती जयवंती हिंदोळा यांचे हस्ते पारितोषिके देण्यात आली.

Exit mobile version