जिल्हा बुद्धिबळ संघटना, पीएनपीतर्फे जयंत चषक बुद्धिबळ स्पर्धा

Businessman suit with chess board game. Plan stratgy and tactic concept

अलिबाग । वार्ताहर ।
शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच जयंत चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन गुरुवारी (7 जुलै) जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि पीएनपी एज्युकेशन सोसायटच्यावतीने केले आहे.

पीएनपी कॉलेज वेश्‍वी गोंधळपाडा येथे सकाळी 10 वाजता खुल्या व वयोगटनुसार स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेची बक्षिसे खुला गट प्रथम क्रमांक 3500 आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांक आणि ट्रॉफी, तृतीय क्रमांक 1500 अणि ट्रॉफी, चतुर्थ क्रमांक 1000 आणि ट्रॉफी ,पाचवा 700आणि ट्रॉफी. सतरा वर्षांखालील ग्रुप प्रथम क्रमांक 2000 आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 1500 आणि ट्रॉफी, तृतीय क्रमांक 1000आणि ट्रॉफी, चतुर्थ 700 आणि ट्रॉफी, पाचवा 500 आणि ट्रॉफी, तेरा वर्षा खालील ग्रुप प्रथम क्रमांक 1500 आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 1000 आणि ट्रॉफी, तृतीय क्रमांक 700 आणि ट्रॉफी चतुर्थ 500 आणि ट्रॉफी पाचवा 300 आणि ट्रॉफी उत्तेजनार्थ बक्षीस 500, 500, 500 प्रत्येक ग्रुप साठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

अधिक माहिती आणि संपर्क यासाठी विलास म्हात्रे 8888011411,सुशील गुरव 9822774278, संदीप पाटील उरण. 9920351983, उ .छ पाटील 7021725109 पनवेल, अमित कदम 9619190781 खारघर, मिलिंद बोधनकर खोपोली, 9823283151, रवींद्र पेढवी पाली 9226738294, राहुल रहाळकर, महाड 7756024999, किशोर देशपांडे गोरेगांव 8888250234, सुनील घोलप नागोठणे ,9284086702.

Exit mobile version