मोदी सरकार म्हणजे हुकूमशाही प्रवृत्तीचं सरकार – आ. जयंत पाटील

| सोलापूर | प्रतिनिधी |

मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्य करण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षात मात्र मुघलांसारखं राज्य करीत असल्याची टीका शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केली. सोलापूर येथे शनिवारी (दि.2) प्रागतिक पक्ष महाराष्ट्रची पहिली जनजागरण सभा हुतात्मा स्मृती भवन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सीपीएमचे कॉ. उदय नारकर, एस.एस.शेख, सीपीआयचे कॉ. सुभाष लांडे, जनता दलचे प्रताप होगाडे, बीआरएसपीचे धीरज बगाडे, समाजवादी पार्टीचे रऊफ शेख तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. जयंत पाटील यांनी जालना येथे झालेल्या आंदोलकांवर लाठी चार्जचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच गेली नऊ वर्ष मोदी सरकार हुकुमशाही करत असल्याचे सांगत धार्मिक तेढ निर्माण करण्याचं राजकारण भाजप सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यापुढे ते म्हणाले सीबीआय, ईडी या यंत्रणेची दहशत दाखवून, विरोधकांचे फोडाफोडीचे राजकारण करून संविधान बदलण्याचे कारस्थान मोदी सरकारले सुरू केले आहे. सध्या देशात अल्पसंख्यांक, दलित, आदिवासी समाज दहशतीखाली आहे. अल्पसंख्यांक समाज सुरक्षित नाही. महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. कामगारांवर हल्ले होत आहेत. कामगार कायदे रद्द करून कामगारांची सुरक्षा काढून घेण्याचं काम भाजप सरकार करीत आहे. प्रागतिक पक्षाची आघाडी इंडिया आघाडीचाच भाग आहे. मोदी सरकारच्या अन्यायाला वाच फोडण्याचे काम आघाडी करेल, असेही ते म्हणाले.

दोन दिवसांपासून जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावामध्ये मराठा समाजाकडून संविधानिक व कायदेशीर पद्धतीने मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर मागण्यांसाठी उपोषणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन सुरू असताना पोलिस प्रशासनाच्या सहाय्याने आंदोलन चिरडण्यासाठी मराठा समाज बांधवांवर अत्यंत अमानुषपणे लाठी हल्ला केला. त्यांना पांगवण्यासाठी गोळीबार सुद्धा झाला. या अमानवी, निर्दयी लाठी हल्ल्यामध्ये अनेक समाजबांधव गंभीररित्या जखमी झाले असून माता -भगिनींची डोकी सुध्दा फुटली आहेत. घटना अतिशय निंदनिय असून या अमानवी कृत्याचा, निर्दयीपणे केलेल्या लाठी हल्ल्याचा तसेच गोळीबाराचा आम्ही सकल मराठा समाज अलिबाग हे पोलिस प्रशासन आणि राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करीत आहोत.

सुमित माने- सकल मराठा समाज अलिबाग युवा कार्यकर्ता, शेकाप युवा कार्यकर्त
Exit mobile version