टायर फुटल्याने जीपचा अपघात; 3 मजूर महिलांचा मृत्यू

9 महिला गंभीर जखमी

। सोलापूर । वृत्तसंस्था ।

सांगोला-जत या मार्गावर शनिवारी (दि.11) सोनंद गावाजवळ अपघात घडला आहे. कर्नाटकातील अथणी येथील मजूर महिला पंढरपूर तालुक्यात द्राक्ष बागेतील कामांसाठी जीपमधून जात असताना जीप गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये 3 मजूर महिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर 9 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर, अपघातातील मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिकांनीही तक्काळ घटनास्थळी येऊन मदतकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला.

Exit mobile version