| पनवेल | प्रतिनिधी |
जिपने मोटरसायकलला धडक दिल्याने 1 जण जखमी झाला. चालकाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहाजी शंकर पाटील हे सेक्टर 27, तळोजा फेस टू येथे राहत असून ते बृहन्मुंबई महानगरपालिका येथे सफाई कामगार माळी म्हणून काम करतात. ते स्कुटी क्रमांक घेऊन तळोजा येथे राहते घरी येत होते. कामोठे ब्रिज खालून कळंबोलीकडे येत असताना पुण्याच्या दिशेने जाणार्या पिकअप गाडीने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. यात ते खाली पडले व त्यात जखमी झाले.






