जीवन गावंड म्हणजे शेकाप नाहीः बाळाराम पाटील

। चिरनेर । वार्ताहर ।

जीवन गावंड म्हणजे शेतकरी कामगार पक्ष नाही. कार्यकर्ते हे शेकापच्या बाजूने ठाम आहेत. एक कार्यकर्ता बाहेर पडला म्हणून पक्षाचे काही फार नुकसान होत नाही, असे मत शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले. उरण पूर्व विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड हे पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर उरण पूर्व विभागातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठत पाले येथे पार पडली. त्याप्रसंगी कार्यकर्त्यांना मार्गदशन करताना ते बोलत होते.

जीवन गावंड यांच्यासाठी पक्षाने काय केले हे मी सांगण्याची गरज नाही. आपण सर्व कार्यकर्ते याचे साक्षीदारआहात. ज्या नेत्यांना मानसपुत्र आणि मानसकन्या मानले, अशा नेत्यांची साथ सोडून देणे यापेक्षा आणखी कोणती वाईट गोष्ट असेल. स्वार्थासाठी माणसं काय करु शकतात याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे जीवन गावंड असल्याचे पाटील यांनी सांगितले.

जीवन गावंड यांच्या बरोबर उरण पूर्व विभागातील एकही पक्षाचा कार्यकर्ता जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सुरेश पाटील, रमाकांत पाटील, देवीचंद म्हात्रे यांनी जीवन गावंड यांचा आपल्या भाषणातून खरपूस समाचार घेतला. यावेळी उरण पंचायत समितीचे माजी सभापती नरेश घरत, पिरकोन पंचरत्न अध्यक्ष अनंत गावंड, माजी सरपंच हरेंद्र गावंड, सदस्य निखील गावंड, आवरेगाव अध्यक्ष संजय गावंड, आवरे माजी उपसरपंच मनोज गावंड, रविंद्र म्हात्रे, चिरनेर विभाग चिटणीस संदीप गावंड, प्रभाकर गावंड, विलास म्हात्रे, विनोद म्हात्रे, कोप्रोली उपसरपंच देवीचंद म्हात्रे, परशुराम पाटील, दिनेश म्हात्रे, सारडे सरपंच चंद्रशेखर पाटील, वशेणी सदस्य सुनिल ठाकूर, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, पिराकोन, सारडे, वशेणी, पूनाडे, चिरनेर, भोम, कळंबुसरे, पाले, गोवठणे, आवरे तसेच पंचक्रोशितील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत पाले पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले. यावेळी बाळाराम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. राजू म्हात्रे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेकाप पाले ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version