मंदिरातील दानपेटी चोरणारा जेरबंद

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोलीतील पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात शुक्रवारी दि.14 जुलै रोजी घडली होती. मंदीर परिसरातील सीसीटिव्ही बंद असल्याने आरोपी पकडण्यासाठीचे मोठे आव्हान असतान पोलिसांनी एकनाथ कातकरी (वय -21 वर्ष),रा.पेरूची वाडी,चावणे, ता-पनवेल याला घरात अटक केली असून रोख रक्कम नऊ हजार रूपये जमा केली आहे. पोलिसांकडे कोणतेही पुरवा नसतानाही सराईत चोरट्याला अटक केल्याने खोपोली पोलिसांच्या धडाकेबाज कारवाई कौतुक होत आहे.

चोरट्यांने स्क्रुड्राव्हर,पकडीच्या सह्याने दानपेटीचा कुलूप तोडून दानपेटीतील रक्कम लंपास केल्याची घटना खोपोलीतील पेशवेकालीन विरेश्वर मंदिरात चोरी केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती कळताच खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक शितल राऊत घटनास्थळी पोहचून मंदीरातील कसून चौकशी करीत गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरिक्षक सुधाकर लहाने यांच्याकडे सोपविला.लहाने यांनी गोपनीय माहितीद्वारे तपास सुरू करीत आरोपी एकनाथ कातकरी याने मंदीरात चोऱ्या केल्या असल्याचे माहिती मिळाली.चोरीच्या दिवशी खोपोलीत आला असल्याचे खबर मिळताच पोलिस उपनिरिक्षक सुधाकर लहाने यांनी पो.ह.दबडे यांच्यासह तपास पथकाला सोबत घेवून आरोपी रा.पेरूची वाडी,चावणे,ता- पनवेल येथून अटक केला आहे. आरोपीकडून नऊ हजाराची रोकड जप्त केली आहे.

Exit mobile version