। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील निजामपूर नवे नगर येथील बंद घराची घरफोडी चोरी करून अज्ञात चोरटे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाले आहेत. याबाबतची फिर्याद लकेश अशोक खांडेकर रा.निजामपूर नवे नगर ता.माणगाव यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील फिर्यादी लकेश खांडेकर हे घर बंद करून बाहेर गेले असता त्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची काडी कोयंडा उपकुन घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम 32 हजार रुपये असा एकूण 74 हजार रुपयांचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत. या गुन्ह्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.260/2021 भादवि संहिता कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.