अंजली गोडसेनी घेतले 5 बळी
। पोयनाड । प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित 14 वर्षा खालील क्रिकेट स्पर्धेत यंगस्टर्स क्रिकेट स्पोर्ट्स कर्जत संघाचा सलामीच्या फलंदाज कबीर जगताप यांनी एसबीसी महाड संघा विरोधात खेळताना स्पर्धेतले पाहिले शतक झळकावले. 107 चेंडूंमध्ये 20 चौकारांच्या सहाय्याने त्यांनी 122 धावा काढल्या. कबीरच्या शतकाच्या जोरावर कर्जत संघाने प्रथम फलंदाजी करताना 40 षटकांच्या समाप्ती नंतर 9 गडी बाद 254 धावा केल्या त्याला प्रति उत्तर देताना महाड संघाने 184 धावात सर्व गडी गमावले. कर्जत संघाने सामना 70 धावाने जिंकला. कबीर जगताप याला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.
दुसर्या झालेल्या सामन्यात भेंडखळ क्रिकेट अकॅडमीची अष्टपैलू खेळाडू अंजली गोडसे हिने अचूक गोलंदाजी करत एसबीसी महाड संघा विरुद्ध 5 बळी घेतले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारलेल्या महाड संघाने आपले सर्व गडी गमावत 113 धावा केला त्यात भेंडखळ संघांची जलदगती गोलंदाज अंजली गोडसे हिने 5 घेतले. 113 धावांचा पाठलाग करताना भेंडखळ संघाने 4 गड्यांच्या मोबदल्यात 19व्या षटकात 114 धावांचे लक्ष पूर्ण करत सामना जिंकला. सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणार्या अंजली गडसे हिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. अंजली जगताप हिचा महाराष्ट्राच्या 19 वर्षा खालील निवड चाचणीत पहिल्या 30 खेळाडूंमध्ये निवड करण्यात आली आहे. झुंझार युवक मंडळांनी आयोजित केलेल्या एक दिवसीय 40 षटकांच्या साखळी स्पर्धेत मुलांच्या बरोबरीने मुली देखील आपल्या खेळाचे कौशल्य दाखवत आहेत.