| खोपोली । प्रतिनिधी ।
राजमाता जिजामाता आणि स्त्रीयांना शिक्षकनाची दारे खुले करून देणार्या सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या वतीने खालापूर तालुका आणि खोपोली शहरातील 100 महिला बचत गटांचा सन्मान तसेच महाराष्ट्र शासन कृषि विभाग व आत्मा यांच्या सहयोगाने विकेल ते पिकेल या योजनेतून महिला बचत गटांना विक्री व्यवस्थापन व व्यवसाय निर्मिती मार्गदर्शन कार्यक्रम मंगळवार (दि.3) महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाला. महिलांना बचतगटाच्या माध्यमातून सहकार्य देणार्या खालापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांना जिजामाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या प्रसंगी खालापूरच्या नायब तहसिलदार कल्याणी कदम, कृषी अधिकारी अर्चना सुळ, खोपोलीचे पोलिस निरिक्षक शिरीष पवार, माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर,माजी नगरसेवक मोहन औसरमल,किशोर पानसरे,शिंदे गटाचे कर्जत-खालापूर संपर्क प्रमुख पंकज पाटील,शहर अध्यक्ष संदीप पाटील,पं.स.प्रभाग समन्वयक भावना पाटील,गोदरेज कंपनीचे सीएसआर फंड प्रमुख तानाजी चव्हाण आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुंत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी केले.