मुंबई | प्रतिनिधी |
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 44व्या वार्षिक महासभेमध्ये रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी अनेक महत्वाचा घोषणा केल्या.यामध्ये फाईव्ह जी मोबाईल,स्वस्त लॅपटॉपची निर्मिती करण्याबरोबरच सौदी अरबमधील सौदी अरामको या कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. यामुळे कोकणातील रखडलेल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
फाईव्ह जी मोबाईल,स्वस्त मोबाईल
देशातील 5g मोबाईलची स्पर्धा पाहता रिलायन्सकडून सर्वाधिक स्वस्त 5g स्मार्टफोन लॉन्चची घोषणा करण्यात आली.याशिवाय सर्वात स्वस्त लॅपटॉप लॉन्च केला जाणार आहे. हा लॅपटॉप 4g lte कनेक्टिव्हिटी सोबत असेल आणि Android आधारित JioOS वर काम करेल असा दावा करण्यात आला आहे. गेल्या वर्षी गुगल कडून रिलायन्स उद्योग समूहाला 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली होती.
रिलायन्स-सौदी अरामको करार
रिलायन्सच्या ऑईल-टू-केमिकल आणि सौदी अरबची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या सौदी अरामको यांच्या दरम्यान 15 अब्ज रुपयांच्या व्यवहाराची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. यामध्ये रिलायन्सच्या ऑईल टू केमिकलच्या 20 टक्के भागिदारी विक्रीसंबंधी बोलणी सुरु आहे. पण गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता त्यामध्ये फारशी काही प्रगती झाली नव्हती. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना या व्यवहाराची घोषणा मुकेश अंबानी यांनी केली आहे.यामुळे राज्यातील रखडलेला नाणार रिफायनरी प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान नीता अंबानी यांनी देखील जिओ इन्स्टिट्यूटविषयी एक घोषणा केली आहे. यावर्षीपासून जिओ इन्स्टिट्युट सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याची स्थापना नवी मुंबईमध्ये याची स्थापना केली जात असल्याचे नीता अंबानी यांनी सांगितले. एजीएमच्या बैठकीत त्यांनी इतरही अनेक घोषणा केल्या.
महत्त्वाच्या 5 मोहिमा
नीता अंबानी म्हणाल्या व्यवसायासोबत समाजाला सक्षम बनविणे देखील आमचे काम आहे. हे लक्षात घेता रिलायन्स फाऊंडेशने महत्त्वाच्या 5 मोहिमा सुरू केल्या आहेत. यामध्ये पहिली मिशन ऑक्सिजन, दुसरी – मिशन कोविड इन्फ्रा, तिसरी- मिशन अन्न सेवा, चौथी- मिशन कर्मचारी सेवा आणि पाचवी – मिशन लस सुरक्षा,
रिलायन्सने आतापर्यंत 2 आठवड्यांत, दररोज 1100 मेट्रिक टन ऑक्सिजन तयार केले आहे. रिलायन्स देशातील 11 टक्के वैद्यकीय ऑक्सिजन तयार करीत आहे. तसेच आम्ही दररोज 15,000 करोना चाचणी क्षमता तयार केली आहे. आमचे रिलायन्स कुटुंब आम्हाला प्रेरणा देते आणि हे विशाल कुटुंब आमच्यासाठी प्रेरणास्थान, असल्याचे निता अंबानी म्हणाल्या.