नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ज्येष्ठ आसामी लेखक नीलमणि फूकन यांना सन 2021 आणि कोंकणी साहित्यकार दामोदर मौउजो यांना सन 2022 सालचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करणअयात आला आहे.ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीने या पुरस्कारांची घोषणा केली आहे. सुप्रसिद्ध कथाकार, प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखालील माधव कौशिक, सैय्यद मोहम्मद अशरफ, प्रो. हरीश त्रिवेदी, प्रो. सुरंजन दास, प्रो. पुरुषोत्तम बिल्माले, श्री चंद्रकांत पाटिल, डॉ. एस. मणिवालन, श्रीमती प्रभा वर्मा, प्रो. असग़र वजाहत और मधुसुदन आनन्द आदींच्या समितीने ही निवड जाहीर केली आहे.