व्यापाराला चालना देण्यासाठी जेेएनपीचा पुढाकार

। उरण । वार्ताहर ।
 जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर; मुंबई बंदर प्राधिकरण   यांच्या संयुक्त विद्यमाने पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशिप  मॉडेलची 25 वर्षे  यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे चिन्हांकित करण्यासाठी दोन दिवसीय  मेरिटाइम पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप कॉन्क्लेव्ह, 2022 चे केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय, भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयोजन करण्यात आले.

कॉन्क्लेव्हचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेेएनपीएचे अध्यक्ष  संजय सेठी, उन्मेष वाघ, राजीव जलोटा, आदेश तितरमारे आदींच्या उपस्थितीत झाले. विकासाचे पीपीपी मॉडेल प्रथम 1990 च्या दशकाच्या मध्यात बंदर क्षेत्रात आणले गेले. जेएनपीएने 1997 मध्ये न्हावा-शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनलसह खासगी कंपनीसोबत पहिला करार केला. तेव्हापासून पीपीपी हा विकासाचा प्राधान्यक्रम बनला.

आपण आर्थिक पुनरुत्थानाच्या एका नव्या युगाला सुरुवात करत असताना, बंदरांच्या विकासाच्या प्रेरणेने, आम्ही खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार सुव्यवस्थित करण्यासाठी उत्सुक आहोत. प्रकल्पांमध्ये असलेल्या अफाट क्षमतेचा लाभ घेणे हा या कॉन्क्लेव्हचा उद्देश आहे.

श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री
Exit mobile version