खासगीकरणविरोधात जेएनपीटी कामगारांची निदर्शने

उरण | वार्ताहर |
जेएनपीटीचे कंटेनर टर्मिनल खासगीकरण करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. यामुळे जेएनपीटीची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. याविरोधात 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जेनपीटी चेअरमन ऑफिस समोर कामगार निदर्शन करणार आहेत.
जेएनपीटीचे कंटेनर टर्मिनल खासगीकरणाचा प्रस्ताव बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत 8 विरुद्ध 2 अशा बहुमताच्या जोरावर प्रस्ताव पास करून पीपीसी तत्वावर 30 वर्षांसाठी जागतिक स्तरावर निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोमवार दि. 23 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेली ही निविदा भरण्यासाठी 18 ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या खासगीकरणाला विरोधी पक्षाच्या नेतेमंडळीने नौकानयन मंत्र्याची भेट घेतली होती. त्यावेळी नौकानयन मंत्री मनसुख मांडविया यांनी खासगीकरण करणार नसल्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु केंद्र सरकारने खासगीकरणाची निविदा प्रसिद्ध करीत आपला हेतू स्पष्ट केला आहे. या खासगीकरणा विरोधात येत्या 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जेनपीटी चेअरमन ऑफिस समोर कामगार निदर्शन करणार असल्याची माहिती जेएनपीटी ट्रस्टी भूषण पाटील यांनी दिली.

Exit mobile version