18 जानेवारीला जोगेश्वरी मातेचा सोहळा

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे गावाची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे मूळ स्थान असलेले नागोठण्याचे पूर्वेकडील डोंगर (घरळी) येथे शांती होम व सत्यनारायण महापूजेचे आयोजन गुरुवार, दि. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पूजा विधी संपन्न झाल्यानंतर दुपारपासून मातेचा दर्शन सोहळा सुरु राहणार आहे.

यानिमित्ताने सायंकाळी 4 ते 7 वा. दरम्यान महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. त्यानंतर 6 ते 8 वा. दरम्यान संतसेवा मंडळ नागोठणे यांचा हरिपाठ होणार आहे. तरी ता भक्तिमय कार्यक्रमास समस्त भाविक, ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा यशस्वी होण्यासाठी खडकआळी ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ तसेच ज्वाला ग्रुप खडकआळी मेहनत घेत आहेत.

Exit mobile version