खोपोली नपातर्फे संयुक्त जयंती महोत्सव

| खोपोली | वार्ताहर |

खोपोली नरपरिषदेच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर सयुंक्त जयंती महोत्सवाचे आयोजनाची तयारी नगरपरिषदेने केली आहे. मंगळवार दि.11 महात्मा फुले यांच्या जयंती पासून दि. 16 पर्यंत विविध व्याख्यान, भव्य मिरवणूक शाहिरांचा महाजलसा तसेच प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन नगरपरिषदेच्या वतीने केले आहे. नियोजित सर्व कार्यक्रमांसाठी भीमअनुयायी तसेच खोपोली शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून यंदाचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करू या, असे अवाहन मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी केले आहे.

संध्याकाळी (दि.11) अँड.वैशाली डोळस (विषय- महिलांचे मुक्तीदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान), बुधवारी (दि.12) छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने सर्वजीत बनसोडे यांचे व्याख्यान (विषय- जनतेच्या जीवघेण्या समस्या तसेच क्रूर जात, धर्माच्या चक्रव्यूहातून वास्तविक मुक्तिचा विचार म्हणजे आंबेडकरवाद कृती संकल्प), गुरूवारी (दि.13) सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान (विषय- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि वर्तमान), शुक्रवारी (दि.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने सकाळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत.

तसेच सांयकाळी 4 वाजता खोपोली बाजारपेठेतून भव्य मिरवणुक, शनिवारी (दि.15) संध्याकाळी 7 वा. शाहीर शीतल साठे, सचिन माळी शाहिरांचा नवयान महाजलसा कार्यक्रम. तसेच रविवारी (दि.16) संध्याकाळी 7 वा. भीम स्वर गंधारप्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Exit mobile version